बॉलिवूडकरांना कोरोनाचा विळखा, पहा आतापर्यंत कोणकोण झालं संक्रमित
देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असून याचा फटका बॉलिवूडकरांना मोठ्या प्रमाणात बसत असल्याचे समोर येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोना विषाणूचे संक्रमण झाले आहे. यातील काही रुग्णालयात दाखल झालेत तर काही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरी क्वारंटाईन झाले आहेत. यामुळे अनेक चित्रपटांचे शुटींग थांबण्यात आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री कतरिना कैफने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी त्वरित स्वत: ला वेगळं केलं असून मी होम क्वॉरंटाईन होणार आहे.
विकी कौशलने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, मी कोणताही निष्काळजीपणा केला नाही. सर्व गोष्टींबाबत खबरदारी घेतली. तरीही मला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या मी क्वॉरन्टाईन असून डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे उपचार घेत आहे.
अभिनेता रणबीर कपूर कोरोनामुळे संक्रमित झाला आहे.
गायक आदित्य नारायण आणि त्याची पत्नी श्वेता अगरवाल यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आदित्य नारायणने ही बातमी त्याच्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दिली आहे.
आदित्य आणि श्वेता यांचे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न झालं होतं.
शशांक खेतान यालाही कोरोनाची लागण झाली आहे.
आलियाने सोशल मीडियावर पोस्ट केले की, माझी कोविड-19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तिने स्वत:ला होम क्वारंटाईन केलं असून सर्व नियमांचं पालन करत आहे. तुम्हा सर्वांच्या काळजीबद्दल आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद
दाक्षिणात्य अभिनेता आर माधवनचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी देखील कोरोनाच्या कचाट्यात सापडले.
बप्पी लहिरी यांनी 17 मार्चला सोशल मीडियावर सांगितलं होतं की त्यांनी कोरोनाची लस घेतली आहे. कोरोना लसीची प्रक्रिया सुलभ असल्याचं सांगत त्यांनी देशातील प्रत्येकाने कोरोनाची लस घ्यावी असं आवाहन केलं होतं. त्यांच्या मुलगी रीमा म्हणाल्या की, बप्पी दा नी कोरोनाबद्दल प्रचंड सतर्कता बाळगली होती, त्यांनी कोरोनाची लसही घेतली आहे. तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
अभिनेत्री भूमी पेडणकर कोरोनाने संक्रमित आहे.
आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती स्वतः गोविंदा यांनी दिली आहे. मला कोरोनाची लागण झाली असून माझा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मला सौम्य लक्षणं जाणवत आहेत. कुटुंबातील इतर सर्वांची कोरोन चाचणी केली असून त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आली आहे. पत्नी सुनीता हिने काही दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केली होती, अशी माहिती अभिनेते गोविंदा यांनी दिली आहे.
अभिनेता अक्षय कुमारने रविवारी (4 एप्रिल) सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला कोरोनाची लागण झाली असून आयसोलेट केल्याचं सांगितलं होतं. पण आता एबीपीला मिळालेल्या माहितीनुसार अक्षय कुमारच्या आगामी 'राम सेतु' चित्रपटाशी संबंधित 45 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत ठीक आहे. पण खबरदारी म्हणून मला रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार मी अॅडमिट झालो आहे. लवकरच परत येईन. तुम्ही आपली काळजी घ्या. असं ट्वीट अक्षयकुमारने केलं आहे.
कॉमेडीयन कुणाल कामरालाही कोरोनानं गाठलंय.