Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gautami Patil : गौतमी पाटीलचं खरं नाव काय? जाणून घ्या
नृत्यांगना सबसे कातील गौतमी पाटील (Gautami Patil) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या नृत्याने गौतमीने सर्वांनाच घायाळ केलं आहे.
आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ करणाऱ्या गौतमीचं खरं नाव मात्र वेगळचं आहे.
पुण्यातील जुन्नर येथील केवाडी भागात आदिवासी नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गौतमी पाटीलदेखील उपस्थित होती.
गौतमीला भेटण्यासाठी तिची एक चिमुकली चाहतीदेखील उपस्थित होती. दरम्यान आपल्या चाहतीला गौतमीने तिचं नाव विचारलं.
चाहतीने आपलं नाव 'वैष्णवी' असल्याचं सांगितलं. त्यावर नृत्यांगना म्हणाली,माझंदेखील जन्मनाव वैष्णवी आहे.
चाहतीसोबत गप्पा मारताना गौतमीने आपलं खरं नाव जगजाहीर केलं आहे.
आता वैष्णवी या नावामुळे गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
गौतमी पाटील आणि वाद हे समीकरण झालं आहे. नृत्यांगनेच्या नावावरुन याआधीदेखील वाद झाला होता. गौतमीने पाटील आडनाव लावू नये असा इशारा तिला देण्यात आला होता.
गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. तिने पाटील आडनाव लावलं तर महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा मराठा समन्वयकडे राजेंद्र जराड पाटील यांनी दिला होता.