Gautami Patil : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार? काय आहे प्रकरण...
'लावणी क्वीन' गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त मुद्द्यामुळे चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगौतमी पाटीलच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.
सातारा न्यायालयाने गौतमीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
गौतमी पाटील अश्लील डान्स करत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी प्रतिमा शेलार यांनी गौतमी तिच्या नृत्यात अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती.
आता त्यांच्या तक्रारीची दखल घेत सातारा न्यायालयाने गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
गौतमीने आपल्या सौंदर्याने आणि अदांनी महाराष्ट्रालील गावागावांतील सर्वच तरुणांना भूरळ घातली आहे.
26 वर्षीय गौतमीने आपल्या नृत्याने सर्वांनाच वेड लावले आहे.
लावणी सादर करताना त्यात अश्लीलपणा करू नये असं म्हणत गौतमीच्या नृत्यावर टीका करण्यात आली आहे.
गौतमी लवकरच 'घुंगरु' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.