Fukrey 3 Box Office Collection Day 6: 'फुकरे 3' चा बॉक्स ऑफिसवर जलवा; जाणून घ्या कलेक्शन
Fukrey 3 Box Office Collection
1/9
'फुकरे-3' हा कॉमेडी ड्रामा चित्रपट प्रदर्शित होऊन 7 दिवस झाले आहेत. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला आहे.
2/9
अनेक प्रेक्षकांनी 'फुकरे-3' या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली आहे.
3/9
'फुकरे 3' हा चित्रपट गेल्या महिन्यात 28 सप्टेंबरला रिलीज झाला होता. या चित्रपटाने सहाव्या दिवशी 4.11 कोटींची कमाई केली होती.
4/9
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'फुकरे 3' या चित्रपटानं सातव्या दिवशी 4.00 कोटी रुपयांची कमाई केली यासोबतच चित्रपटाचे एकूण कलेक्शन 63.28 कोटी रुपये होईल, असा अंदाज लावला जात आहे.
5/9
पुलकित सम्राट, ऋचा चढ्ढा, पंकज त्रिपाठी, वरुण शर्मा आणि मनजोत सिंग या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
6/9
'फुकरे 3' या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर चार दिवसात 43.55 कोटींची एकूण कमाई केली.
7/9
'फुकरे 3' या चित्रपटामधील कलाकारांच्या विनोदी शैलीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. तसेच या चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचं देखील अनेक जण कौतुक करत आहेत.
8/9
'फुकरे' आणि 'फुकरे रिटर्न्स' या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता फुकरे-3 देखील प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
9/9
'फुकरे' हा चित्रपट 2013 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर 2017 मध्ये 'फुकरे रिटर्न्स' हा चित्रपट रिलीज झाला.
Published at : 04 Oct 2023 09:26 PM (IST)