Fukrey 3 box office collection day 3: 'फुकरे 3' ची छप्परफाड कमाई; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...
'फुकरे 3' हा चित्रपट 28 सप्टेंबर रोजी रिलीज झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'फुकरे 3' या कॉमेडी ड्रामा चित्रपटात रिचा चढ्ढा, पुलकित सम्राट, वरुण शर्मा, पंकज त्रिपाठी आणि मनजोत सिंग यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
फुकरे-3 या चित्रपटानं तीन दिवसात कोट्यवधींची कमाई केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचे तीन दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन...
फुकरे-3 या चित्रपटानं पहिल्या दिवशी 8.82 कोटींची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 7.81 कोटींची कमाई केली.
'फुकरे 3' या चित्रपटानं शनिवारी (30 सप्टेंबर) 11.67 कोटींची कमाई केली आहे. आता या चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई 28.30 कोटी एवढी झाली आहे.
द वॅक्सिन वॉर आणि चंद्रमुखी-2 या चित्रपटासोबत 'फुकरे 3' या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली आहे.
'फुकरे' हा चित्रपट 2013 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर 2017 मध्ये 'फुकरे रिटर्न्स' हा चित्रपट रिलीज झाला.
'फुकरे' आणि 'फुकरे रिटर्न्स' या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
'फुकरे 3' या चित्रपटामधील कलाकारांच्या विनोदी शैलीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. तसेच या चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचं देखील अनेक जण कौतुक करत आहेत.