शाहरुख खानपासून ते अमिताभ बच्चनपर्यंत हे स्टार्स झाले होते कर्जबाजारी

संग्रहित छायाचित्र

1/5
मीडिया रिपोर्टनुसार, महानायक अमिताभ यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, तेही एकेकाळी कर्जबाजारी झाले होते. बच्चन म्हणाले होते, 2002 साली माझ्या हातात कोणतेही काम नव्हते, माझ्याकडे एकही चित्रपट नव्हता. साल 1999 मध्ये अमिताभ बच्चन यांची कंपनी आर्थिक अडचणीत सापडली होती. यामुळे त्यांना आपली संपूर्ण मालमत्ता गहाण ठेवावी लागली होती.
2/5
शाहरुख खानचेही नाव या यादीमध्ये समाविष्ट झाले होते. पण आज तो संपूर्ण जगातील तिसरा श्रीमंत अभिनेता आहे. एक वेळ अशी आली होती की शाहरुख खान दिवाळखोर झाला होता. शाहरुखने रावण चित्रपटाची निर्मिती केली होती. या वृत्तानुसार शाहरुखने आपला सर्व पैसा या चित्रपटासाठी ओतला होता. आणि त्याच्याकडे मोजकेच पैसे शिल्लक होते.
3/5
आजही बॉलिवूडमध्ये गोविंदाचा बोल-बाला आहे. त्याने स्वत:च्या प्रॉडक्शन चित्रपटातून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. एक वेळ अशी आली की गोविंदा कर्जबाजारी झाल्या होता. तो अक्षरशः प्रेससमोर रडला होता.
4/5
प्रीती झिंटाने स्वत:च्या प्रोडक्शन कंपनीत 'इश्क इन पॅरिस' हा चित्रपट बनविला. निर्माती म्हणून प्रीतीसाठी हा पहिलाच चित्रपट होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. ज्यामुळे प्रीतीची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती.
5/5
राज कपूर अजूनही 'मेरा नाम जोकर' चित्रपटासाठी ओळखले जातात. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. या चित्रपटाने राज कपूरला कर्जबारी बनवले. ज्यामुळे त्याने आपल्या सर्व वस्तू आणि स्टुडिओ तारण ठेवले.
Sponsored Links by Taboola