In Pics | घटस्फोटानंतर 'या' अभिनेत्रींनी केलं नाही पुन्हा लग्न

बॉलिवूडमधील काही जोड्या अशा आहेत की त्यांनी संसारात काही काळ रमल्यानंतर घटस्फोट घेतला. घटस्फोट घेतलेल्या अनेकांनी पुन्हा लग्न करुन आपल्या नवीन संसाराला सुरुवात केली. पण बॉलिवूडमधील अभिनेत्री अशा आहेत की त्यांनी घटस्फोट घेतल्यानंतर पुन्हा कधी लग्न केलं नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांनी आपल्या लग्नानंतर 11 वर्षानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. करिश्माला तिच्या मुलांची, समायरा आणि कियानची कस्टडी मिळाली आहे. करिश्माचा घटस्फोट 2016 साली झाला होता.

सुजान खान आणि ऋतिक रोशन यांनी आपल्या 14 वर्षांच्या संसारानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आता या घटनेला सात वर्षे पुर्ण झाली आहेत पण या दोघांपैकी कोणीही दुसरे लग्न केलं नाही.
रीना दत्ता आणि आमीर खान यांनी 16 वर्षाच्या संसारानंतर 2002 साली वेगळं होण्याचा निर्णय घेतला. नंतर आमिरने किरण रावशी लग्न केलं.
मोना शौरी आणि बोनी कपूर यांनी घटस्फोट घेतल्यानंतर मोना शौरीने अर्जुन आणि अंशुला या दोन मुलांची देखभाल केली. बोनी कपूरने श्रीदेवीशी नव्याने संसार मांडला. मार्च 2021 साली मोना शौरीचा मृत्यू झाला.
अमृता सिंह आणि सैफ अली खान यांनी 2004 साली घटस्फोट घेतला. त्यांना सारा आणि इब्राहिम अशी मुले आहेत. सैफने अमृताशी घटस्फोट घेतल्यानंतर करिनाशी लग्न केलं पण अमृता सिंहने सिंगलच राहणे पसंत केलं.