प्रियंका चोप्रा ते दीपिका पदुकोण...या कलाकारांच्या नावाने आहेत डिशेस्

अमेरिकेतील ऑस्टिन शहरातील एका रेस्टॉरंटमधील डोसाचे नाव अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या नावावरून दीपिका ठेवण्यात आले आहे. याशिवाय अभिनेत्रीच्या नावावर पुण्यात पराठाही मिळतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांतचे कोट्यवधी चाहते आहेत. चेन्नईच्या न्यू नीला भवन रेस्टॉरंटमध्ये त्याच्या नावावर 12 पदार्थ मिळतात.

चंदिगडमधील एका ढाब्यावर रणबीर कपूरच्या नावाने एक खास चिकन मिळतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीरही त्याच्या 'राजनीती' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिथे गेला होता.
जगभरात शाहरुख खानचे चाहते आहेत. त्याचवेळी बनारसमध्ये किंग खानच्या नावावर पान मिळतं. शाहरुखने स्वतः एकदा या दुकानात पान खाल्ल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून तिथे अभिनेत्याच्या नावाने पान विकले जाते.
मुंबईतील मोहम्मद अली रोडवरील एका हॉटेलमध्ये अभिनेता संजय दत्तच्या नावाने चिकन डिश मिळते. या डिशची रेसिपी स्वत: संजय दत्तने सांगितली होती.
सलमानच्या नावाने एका चाहत्याने एक संपूर्ण रेस्टॉरंट उघडले आहे, ज्याचे नाव आहे 'भाईजान'. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तेथे, चुलबुल चावल, प्रेम डेझर्ट यांसारख्या पदार्थांची नावे सलमान खानच्या पात्रांच्या नावावर ठेवण्यात आली आहेत.