September OTT Release: घरबसल्या पाहा ओटीटीवरील धमाकेदार वेब सीरिज आणि चित्रपट
ओटीटीवरील या वेब सीरिज आणि हे चित्रपट तुमचे मनोरंजन करतील.
September OTT Release
1/9
नेटफ्लिक्स ,सोनी लिव्ह, हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही घरबसल्या चित्रपट आणि वेब सीरिज पाहू शकता. ओटीटीवरील या वेब सीरिज आणि हे चित्रपट तुमचे मनोरंजन करतील.
2/9
दोन सप्टेंबर रोजी अक्षय कुमारचा कठपुतली हा चित्रपट रिलीज झाला. डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. हा चित्रपट रतसानन या साऊथ चित्रपटाचा रिमेक आहे.
3/9
अभिनेता विद्युत जामवालचा खुदा हाफिज-2 हा चित्रपट 2 सप्टेंबर रोजी ओटीटीवर रिलीज झाला. हा चित्रपट तुम्ही झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
4/9
चित्रपटामध्ये विद्युत जामवालसोबतच शिवालिका ओबेरॉयनं देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
5/9
हॉलिवूडमधील सुपरस्टार क्रिस हेम्सवर्थ याचा सुपरहिट थॉर लव्ह अँड थंडर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हा चित्रपट 8 सप्टेंबर रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला.
6/9
द लॉर्ड ऑफ द रिंग्स या सीरिजचा द रिंग्स ऑफ पावर हा भाग ओटीटीवर रिलीज झाला आहे. हा हॉलिवूडचा प्रसिद्ध शो अॅमेझॉन प्राइमवर प्रेक्षक पाहू शकतात.
7/9
नेटफ्लिक्सची प्रसिद्ध वेब सीरिज फॅब्युलस लाइफ ऑफ बॉलिवूड वाइव्सचा दुसरा सिझन दोन सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्री नीलम कोठारी, महीप कपूर, सीमा खान आणि भावना पांडे यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
8/9
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुदीप किच्चा याच्या विक्रांत रोना या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. हा चित्रपट झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.
9/9
चित्रपटात सुदीप किच्चा याच्यासोबतच जॅकलीन फर्नांडिसनं देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
Published at : 13 Sep 2022 10:29 AM (IST)