Father's Day 2023 : बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील बाप-लेकाच्या प्रसिद्ध जोड्या
फादर्स डे (Fathers Day) निमित्त जाणून घेऊताय बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध बाप-लेकांच्या जोड्या...
Father's Day 2023
1/8
'फादर्स डे' (Father's Day) हा दिवस वडील आणि मुलांच्या नात्यासाठी खास असतो. यावर्षी 18 जून रोजी फादर्स-डे साजरा केला जाणार आहे. यानिमित्तानं जाणून घेऊताय बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध बाप-लेकांच्या जोड्या...
2/8
आर. माधवन हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. आर. माधवनचा मुलगा वेदांत हा चित्रपटसृष्टीपासून दूर राहून क्रीडा क्षेत्रात आपल्या कौशल्याने देशाचे आणि आपल्या वडिलांचे नाव परदेशात उंचावत आहे. वेदांत हा स्विमर आहे.
3/8
अनेक वेळा आर. माधवन हा वेदांचे फोटो शेअर करुन त्याच्या क्रिडा क्षेत्रातील कार्याची माहिती चाहत्यांना देत असतो.
4/8
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. आर्यनची 'स्टारडम' ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शाहरुख आणि आर्यन ही बॉलिवूडमधील बाप-लेकाची प्रसिद्ध जोडी आहे.
5/8
दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट आजही प्रेक्षक आवडीनं बघतात. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे हा देखील अभिनेता आहे. अभिनयनं मन कस्तुरी रे, रंपाट, ती सध्या काय करते या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
6/8
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे हे विविध प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या भेटीस येतात. महेश कोठारे यांच्या झपाटलेला, धुमधडाका, पछाडलेला या चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे हा देखील मनोरंजन क्षेत्रात काम करतो.
7/8
दिवंगत अभिनेता इरफान खान हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत होतं. इरफान यांच्या नॅचरल अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.
8/8
आता इरफान यांचा मुलगा बाबिल खान हा देखील अभिनयक्षेत्रात काम करत आहे. बाबिलच्या नेटफ्लिक्सवरील कला या चित्रपटामधील अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.
Published at : 17 Jun 2023 07:40 PM (IST)