Bollywood Divas : रेखापासून ते राणीपर्यंत लग्नानंतरही 'या' अभिनेत्रींनी लावले नाही पतीचे आडनाव
लग्नानंतर बहुतांश तरुणी आपल्या नावापुढे त्यांच्या पतीचे आडनाव जोडतात.पण काही मुली लग्नानंतर आपले आडनाव न बदलण्याचाही निर्णय घेतात. कारण त्यांना आपली मूळ ओळख बदलायची नसते. बॉलिवूडमधील देखील काही अभिनेत्रींनी देखील हाच निर्णय घेतल्याच पाहायला मिळालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविद्या बालनने सिद्धार्थ रॉय कपूरशी विवाह केला. परंतु आपले आडनाव आजही विद्या बालन असेच लावते. एका मुलाखतीत विद्याने सांगितले की, जर सिद्धार्थ बालन रॉय कपूर नाही बनू शकत तर मी विद्या बालन रॉय कपूर असे नाव का जोडावे?
किरण राव आणि अमिर खान हे 15 वर्षे एकत्र होते. परंतु किरण रावने कधीच आपल्या नावसमोर खान हे आडनाव लावले नाही.
जुही चावलाने व्यावसायिक जय मेहताशी विवाह केला. परंतु कधीच आपल्या नावासमोर मेहता आडनाव लावले नाही.
आदित्य चोप्राशी लग्न केल्यानंतर राणी मुखर्जीने आपले आडनाव बदलले नाही.
बॉलिवूड अभिनेत्री दिपीका पदुकोनने रणवीर सिंहचे आडनाव न जोडून स्वतःच्याच नावाची ओळख कायम जपण्याचा निर्णय घेतला.
विराट कोहलीशी लग्न केल्यानंतर देखील अनुष्का आपल्या नावापुढे शर्मा हे नाव लावते
कुणाल खेमूशी लग्न करूनही सोहा अली खानने आपल्या नावामागे पतीचे नाव लावले नाही.
ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिले जाते. परंतु ट्विंकलने कधीच कुमार हे आडनाव लावले नाही.
मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न करूनही रेखाने तिचे नाव बदलले नाही. मुकेश अग्रवाल यांच्या मृत्यूनंतर रेखा आजही नावाचे कुंकू लावते परंतु आडनाव नाही