Dilip Kumar : बॉलिवूडच्या 'ट्रॅजेडी किंग'चा मोहम्मद युसूफ खान ते दिलीप कुमारपर्यंतचा प्रवास!
हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं असून ते 98 वर्षांचे होते. (Photo Credit : Internet)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे दिलीप कुमार यांना 29 जून रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. (Photo Credit : Internet)
बॉलिवूडचा The First Khan म्हणून दिलीप कुमार यांना ओळखलं जायचं. (Photo Credit : Internet)
दिलीप कुमार यांचं पूर्ण नाव मोहम्मद युसूफ खान (Mohammed Yusuf Khan) होतं. त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी सध्या पाकिस्तानात असलेल्या पेशावारमध्ये झाला होता. फाळणीदरम्यान, त्यांचं कुटुंब मुंबईत येऊन स्थायिक झालं. (Photo Credit : Internet)
मुंबईत आल्यानंतर कुटुंबाला हातभार लावण्यासाठी दिलीप कुमार एका कॅन्टीनमध्ये काम करायचे. तिथे त्यांची भेट अभिनेत्री देविका रानी यांच्यासोबत झाली. त्यांनीच दिलीप कुमार यांना अभिनय करण्याचा सल्ला दिला होता. मोहम्मद युसूफ खान ते दिलीप कुमार इथपर्यंतचा प्रवास देविका रानी यांच्यामुळेच शक्य झाला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दिलीप कुमार ही ओळख देविका रानी यांनीच त्यांना दिली. (Photo Credit : Internet)
दिलीप कुमार यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात 1944 मध्ये ज्वार भाटा या चित्रपटातून झाली. परंतु, दिलीप कुमार यांच्या फिल्मी करिअरला खरी कलाटणी मिळाली ती, 1949 मध्ये आलेल्या महबूब खान यांच्या अंदाज या चित्रपटातून. (Photo Credit : Internet)
जुगनू हा त्यांचा सर्वात हिट चित्रपट ठरला. 1947 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटापासून दिलीप कुमार यांच्या हिट चित्रपटांचं सत्र सुरू झालं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. (Photo Credit : Internet)
आपल्या फिल्मी करिअरसोबतच दिलीप कुमार आपल्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत राहिले. दिलीप कुमार यांचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं जातं. मधुबाला, वैजयंती माला, सायरा बानो, यांसारख्या अभिनेत्रींसोबतच्या लव्ह अफेअरच्या चर्चा विशेष गाजल्या. सायरा बानो आणि दिलीप कुमार यांची प्रेम कहानी सर्वश्रुत आहे. दिलीप कुमार यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत सायरा बानो त्यांच्यासोबत होत्या. (Photo Credit : Internet)
हिंदी सिनेसृष्टीतील मेथड अॅक्टिंगचं क्रेडिट दिलीप कुमार यांनाच देण्यात येतं. (Photo Credit : Internet)