कधीकाळी 200 रुपयांसाठी ओव्हरटाईम, गॅरेजमध्येच पाठ टेकायची..धर्मेंद्र यांनीच उलगडलेला संघर्षकाळ

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी एकेकाळी 200 रुपयेही कमवणे त्यांच्यासाठी कठीण होते. या अभिनेत्याने एकदा त्यांच्या संघर्षाबद्दल सांगितले होते.

Continues below advertisement

Dharmendra

Continues below advertisement
1/7
बॉलीवूडचे ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेता धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. ते 89 वर्षांचे होते. वयामुळे निर्माण झालेल्या आरोग्य समस्यांमुळे ते काही काळापासून अस्वस्थ होते.
2/7
आपल्या दमदार अभिनयाने धर्मेंद्र यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मात्र त्यांच्या यशाच्या मागे अनेक संघर्ष दडलेले होते.
3/7
कुठल्याही साध्या माणसांप्रमाणेच तेही मुंबईत आले आणि स्ट्रगल सुरू केला. आपल्या मेहनतीचा प्रवास त्यांनी एकदा ‘इंडियन आयडॉल 11’च्या मंचावर सर्वांसमोर सांगितला होता.
4/7
पंजाबच्या लुधियाना येथे जन्मलेले धर्मेंद्र आपले संघर्षाचे दिवस आठवत भावूक झाले होते. त्यांनी सांगितले होते, “मी सुरुवातीच्या काळात गॅरेजमध्ये झोपायचो. मुंबईत राहण्यासाठी माझ्याकडे घर नव्हतं. पण पैसे कमवायची इच्छा नेहमीच होती. त्यामुळे मी एका ड्रिलिंग फर्ममध्ये पार्ट-टाईम काम करायचो. तिथे मला महिन्याला 200 रुपये मिळायचे. 200 रुपयांत माझा खर्च भागत नव्हता. त्यामुळे मला ओव्हरटाईम करावा लागायचा.”
5/7
शोदरम्यान त्यांनी शालेय आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “स्कूलनंतर मी एका पुलाजवळ जायचो. तिथे बसून मी माझ्या भविष्यासंदर्भात विचार करायचो. तिथे मी तासंतास बसून राहायचो. आजही जेव्हा मी तिथे जातो, तेव्हा एक आवाज कानात घुमतो ‘धर्मेंद्र, तू अभिनेता झालास!’” ही आठवण सांगताना ते भावूक झाले.
Continues below advertisement
6/7
1960च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करणाऱ्या धर्मेंद्र यांनी जवळपास 300 चित्रपटांमध्ये काम केले. 1970च्या दशकात त्यांना जगातील सर्वात देखण्या पुरुषांमध्ये स्थान मिळाले होते. तसेच त्यांना ‘वर्ल्ड आयर्न मॅन अवॉर्ड’सुद्धा मिळाला आहे. ‘सत्यकाम’, ‘खामोशी’, ‘शोले’, ‘क्रोधी’, ‘यादों की बारात’ हे त्यांचे सर्वात लोकप्रिय चित्रपट ठरले.
7/7
धर्मेंद्र यांनी दोन लग्न केली. त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर आणि दुसरी पत्नी अभिनेत्री हेमा मालिनी. धर्मेंद्र यांना एकूण 6 अपत्यं आहेत.
Sponsored Links by Taboola