PHOTO : ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022’मध्ये दिसणार दीपिका पदुकोणचा जलवा! अभिनेत्री फ्रेंच रीव्हेरीयाला रवाना
दीपिका पदुकोण (Deepika Padukone) ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. काल (9 मे) रात्री ती मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. दीपिका मुंबईहून फ्रेंच रिव्हेरा येथे गेली आहे, जिथे 75व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन केले जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदीपिका या फेस्टिव्हलची ज्युरी असणार आहे. हा मान मिळवणारी ती एकमेव भारतीय अभिनेत्री आहे. यावरून दीपिका चांगलीच चर्चेत आहे. 16 ते 28 मे दरम्यान दीपिका यात व्यस्त असणार आहे.
फ्रेंच रिव्हिएरामध्ये ती आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. दीपिका संपूर्ण फेस्टिव्हलमध्ये उपस्थित राहणार आहे.
फ्रेंच अभिनेता व्हिन्सेंट लिंडन यांच्या अध्यक्षतेखालील 75व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी 8 सदस्यीय ज्युरींमध्ये दीपिका पदुकोणची निवड करण्यात आली आहे. तिच्यासोबत इराणी चित्रपट निर्माते असगर फरहादी, स्वीडिश अभिनेत्री नूमी रॅपेस आणि अभिनेत्री पटकथा लेखक व निर्माती रेबेका हॉल यात सामील होतील.
दीपिका पदुकोणबद्दल बोलायचे तर, तिने एअरपोर्ट लूकसाठी ऑल-बेज आउटफिट निवडला होता. यासह तिने काळ्या रंगाची पर्स कॅरी केली होती. यामध्ये ती एकदम स्टनिंग दिसत होती.
दीपिकाने हलका मेकअप केला होता. दीपिकासोबत तिचा वैयक्तिक बॉडीगार्ड देखील होता. रिपोर्ट्सनुसार, दीपिका 2017 पासून कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नियमित रेड कार्पेटवर तिचा जलवा दाखवत आहे. या वर्षीही ती रेड कार्पेटवर आपल्या स्टाईलने धुमाकूळ घालणार आहे.
दीपिकानं याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना माहिती दिली आहे.