Charlie Chaplin Death Anniversary : नाट्यमय आयुष्य जगलेला अवलिया चार्ली चॅप्लिन!
चार्ली चॅप्लिन एक यशस्वी अभिनेता असण्यासोबत उत्तम दिग्दर्शक, निर्माता आणि संगीतकारही होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचार्लीने वयाच्या 88 व्या वर्षापर्यंत अभिनय, दिग्दर्शन, पटकथालेखक, निर्माता, संगीतकार अशा सर्वच भूमिका लीलया पार पाडल्या आहेत.
चार्ली चॅप्लिनचा जन्म 16 एप्रिल 1889 रोजी ब्रिटनमध्ये झाला.
चार्लीला बालपणीच अत्यंत गरिबी, आई-वडिलांचं विभक्त होणं अशा अनेक गोष्टी अनुभवायला मिळाल्या.
चार्लीने वयाच्या अवघ्या पाचव्या-सहाव्या वर्षी लोकांना हसवायला सुरुवात केली.
1914 साली प्रदर्शित झालेला 'मेकिंग अ लिविंग' हा चार्ली चॅप्लिनचा पहिला मूकपट.
वयाच्या 26 व्या वर्षी चार्ली चॅप्लिन सुपरस्टार झाले होते.
चार्लीने अनेक सिनेमांत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या.
चार्लीने अनेक अविस्मरणीय सिनेमांची निर्मिती केली.
मॉडर्न टाइम्स, द किड, ए डेज प्लेजर, द ग्रेट डिक्टेटर, चॅप्लिन असे चार्लीचे अनेक सिनेमे लोकप्रिय ठरले आहेत.