sunny leone : सनी लिओनी सुरू करतेय 'चिका लोका' नवं हॉटेल
सनी लिओनी होणार या हॉटेल ची मालकीण !
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचिका लोका च्या ग्रॅंड ओपनिंग मागचा सनी लिओनीने सांगितला आहे या मागचा खास किस्सा
अभिनेत्री-उद्योजक सनी लिओन 22 जानेवारी रोजी नोएडा येथील गुलशन वन 29 येथे सिंगिंग बाउल हॉस्पिटॅलिटीच्या साहिल बावेजा यांच्या सहकार्याने सनी लिओनीच्या चिका लोका च उद्घाटन होणार आहे.
पहिलं हॉटेल सुरू करताना ती म्हणते चिका लोका हा माझ्यासाठी नवा अनुभव असणार आहे. हॉटेल इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यासाठी मी उत्सुक तर आहेच पण हा नवा प्रवास अनुभवण्याची मी वाट बघत आहे.
अभिनयाच्या सोबतीने ग्लॅमर वर्ल्डच्या पलिकडे जाऊन आता हा अनुभव घेणं नक्कीच कमालीचं असणार आहे.
लोकांनी यांव इथल्या गोष्टी चा आस्वाद घ्यावा ही आमची इच्छा आहे शेफ वैभव भार्गव यांनी तयार केलेले 7,000 स्क्वेअर फूट पसरलेले फ्लॅगशिप आउटलेट भारतीय, आशियाई, मेक्सिकन आणि इटालियन पाककृतींचे मिश्रण आहे.
जागतिक फ्लेवर्स ची पर्वणी इकडे अनुभवता येणार आहे. पोशन्स बाय सनी लिओनी हे खास बॉलीवूड कॉकटेल इकडे मिळणार आहे.
सनी चा चिका लोका हा हॉटेल इंडस्ट्रीत मधला प्रवास लवकरच सुरू होणार असून स्टेज, बार आणि टेरेससह ही जागा एक नेत्रदीपक ठिकाण आहे यात शंका नाही.
गोवा, हैदराबाद आणि मुंबईमध्ये विस्तार करण्याच्या योजनांसह सनीचा हा खास उपक्रम 22 जानेवारी रोजी नोएडा येथील गुलशन वन 29 येथे सुरू होणार आहे.
गॅस्ट्रोनॉमी आणि मनोरंजनाच्या या नवीन युगात विविध चवींचा आणि सनीच्या मनमोहक भावनेचा प्रवास सुरू करण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.