Madhuri Dixit : उफ्फ... धक् धक् गर्लच्या अदा, माधुरीच्या सौंदर्यावर चाहते फिदा
बॉलिवूडची धक् धक् गर्ल माधुरी दीक्षित नेहमची आपला क्लासी लूक आणि हटके आउटफिट्ससाठी चर्चेत असते. सध्या माधुरीचे नव्या लूकमधील फोटो व्हायरल होत आहेत. तिनं इंस्टाग्रामवर पिंक आउटफिटमधील आपले फोटो शेअर केले आहेत. पण यावेळी सोशल मीडियावर माधुरीच्या लूकपेक्षा तिच्या या आउटफिटच्या किमतीच्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, माधुरी यावेळी डान्सिंग रिअॅलिटी शो 'डान्स दिवाने'मध्ये परिक्षक म्हणून दिसून येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाधुरीच्या या आउटफिटच्या किमतीची चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
रिपोर्टनुसार, या शरारा सेटची किंमत 85,000 रुपये आहे. हा शरारा सेट चंदेरी रेशमपासून तयार करण्यात आला आहे.
माधुरीनं या आउटफिटसोबत हेव्ही ज्वेलरी वेअर केली आहे. त्यामुळे तिचं सौंदर्य आणखी खुललं आहे.
माधुरी सोशल मीडियावर नेहमची अॅक्टिव्ह असते.
वेळोवेळी ती चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.