In Pics : बॉलिवूडकरांच्या या 'वाईट सवयीं'बद्दल तुम्हाला माहित आहे का?
Layer_134_(1)
1/8
बॉलिवूडमधील प्रसिद्ध चेहरे जे आपल्या अनेक चांगल्या सवयींबद्दल ओळखले जातात, त्यांनी काही वाईट सवयींही आहेत. या वाईट सवयींमुळे अनेकजणांना त्रास होतो असं सांगितलं जातं.
2/8
अभिनेत्री करीना कपूरला नखं खाण्याची सवय आहे. अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांत किंवा मुलाखती देत असताना ती नखं खात असल्याचं दिसून येतंय. तसे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर उपलब्ध आहेत.
3/8
अभिनेता आमीर खान आपल्या खाण्याच्या सवयींबद्दल जागरुक नाही असं त्याच्या पत्नीचं म्हणजे किरण रावच मत आहे. तसेच आमीर खान नियमित आंघोळ करत नाही, त्याला ते आवडत नाही असा खुलासा त्याच्या पत्नीने केला आहे.
4/8
सनी लियोनीने खुलासा केलाय की तिला दर 15-20 मिनीटांनी आपले पाय धुवायची सवय आहे.
5/8
जॉन अब्राहमला आपले पाय हालवण्याची सवय आहे. काही केल्या ती सुटत नाही असं तो म्हणतो.
6/8
आयुषमान खुराना ओरल हायजिनवर खूपच सतर्क असतो. त्याने सांगितलं की तो रोज सात ते आठ वेळा दात घासतो.
7/8
अभिनेत्री दीपिका पादुकोन ही एअरपोर्टवरील लोकांचं निरीक्षण करते, त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करते.
8/8
अभिनेत्री प्रिती झिटांला एक वेगळीच सवय आहे. तिला बाथरुम साफ करायला आवडते असं तिनं सांगितलं.
Published at : 29 May 2021 12:24 PM (IST)