PHOTO | बिग बींपासून रणबीर कपूरपर्यंत, 'हे' बॉलिवूडकर कोरोनाच्या विळख्यात
Feature_Photo
1/8
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे वर्षभरापूर्वी याच महिन्यात लॉकडाऊन लावण्यात आला होता. जुलैनंतर अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आणि ऑफिस, कंपन्या अटी-शर्थींसह सुरु झाल्या. बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीसुद्धा सुरु झाली. कोरोनाचे सर्व नियम पाळून शुटिंगला परवानगी देण्यात आली. तरिही अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली.
2/8
बिग बींनाही कोरोनाची लागण झाली होती. गेल्या वर्षी जुलैमध्ये अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती. जवळपास एक महिनाभर ते रुग्णालयात उपचार घेत होते. त्यानंतर कोरोनामुक्त होऊन ते घरी परतले. तसेच त्यांनी पुन्हा नव्या उमेदीनं कामालाही सुरुवात केली.
3/8
अमिताभ बच्चन यांच्यासोबतच अभिषेक बच्चन आणि पत्नी ऐश्वर्या राय बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली होती. ऐश्वर्या आठवडाभरात कोरोनामुक्त होऊन घरी परतली, पण अभिषेक बच्चन जवळपास 20 दिवस रुग्णालयात होता.
4/8
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
5/8
अभिनेत्री कृती सेननलाही कोरोनाची लागण झाली होती. सोशल मीडियामार्फत तिने यासंदर्भात माहिती दिली होती.
6/8
कार्तिक आर्यनलाही एका चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान, कोरोनाची लागण झाली होती.
7/8
आगामी चित्रपट जुग जुग जियोच्या शुटिंगदरम्यान वरुण धवनलाही कोरोनाची लागण झाली होती.
8/8
अभिनेता रणबीर कपूरही कोरोना पॉझिटिव्ह होता. सध्या तो क्वॉरंटाईन आहे.
Published at : 24 Mar 2021 06:22 PM (IST)