PHOTO | 77 लाखांपासून, 37 कोटींपर्यंत; बॉलिवूड बालांचे महागडे ड्रेस
फॅशनचं दुसरं नाव म्हणजे, बॉलिवूड. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी अनेक महागडे आऊटफिट्स वेअर करताना दिसून येतात. सेलिब्रिटींनी वेअर केलेले ड्रेसेस किंवा एखादी अॅक्सेसरीज फॅशन बनते, आणि फॅन्सकडून तो फॅशन ट्रेंड फॉलो केला जातो. आज आपण अशाच काही बॉलिवूड सेलिब्रिटीजच्या महागड्या ड्रेसबाबत जाणून घेणार आहोत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनुष्का शर्मा : अभिनेत्री अनुष्का शर्माने आपल्या लग्नात एक खास डिझायनर लेहेंगा वेअर केला होता. प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जी यांनी डिझाइन केलेला लेहंगा अनुष्काने आपल्या लग्नात वेअर केला होता. गुलाबी रंगाच्या फ्लोरल प्रिंट असणाऱ्या या लेहेंग्याचं वैशिष्ट्य म्हणजे, हा लेहेंगा 67 कारागिरांनी 32 दिवसांच्या मेहनतीनंतर तयार केला होता. दरम्यान, अनुष्काच्या या लेहेंग्याची किंमत 30 लाख रुपये होती.
प्रियंका चोप्रा : अभिनेत्री प्रियंका चोप्राने ग्रॅमी अवॉर्ड्स 2020 मध्ये राल्फ अँड रूसो डिझायनर कंपनीद्वारे डिझाइन केलेला ड्रेस वेअर केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या ड्रेसची किंमत 77 लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.
ऐश्वर्या राय : मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या राय बच्चनने देखील लग्नात कांजीवरम साडी नेसली होती. जिची किंमत जवळपास 75 लाख रुपये होती. ही साडी प्रसिद्ध डिझायनर नीता लुल्लाने ऐश्वर्यासाठी डिझाइन केली होती.
शिल्पा शेट्टी : अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या लग्नात जी साडी वेअर केली होती, असं सांगतात त्याची किंमत 50 लाख रुपये होती. ही साडी डिझायनर तरुण तहिलियानी यांनी खासकरुन शिल्पा शेट्टीसाठी डिझाइन केली होती.
उर्वशी रौतेला : मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री उर्वशी रौतेलानेही 37 कोटी रुपयांचा ड्रेस वेअर केला होता. दरम्यान, एका शुटिंगसाठी तिने हा ड्रेस वेअर केला होता.