PHOTO : Rakul Preet बद्दल या गोष्टी माहिती आहेत का?

रकुल प्रीत सिंह कॉलेजच्या दिवसांपासून मॉडेलिंग करत होती. 2009 मध्ये रकुलने ‘गिली’ या कन्नड चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एका मुलाखतीत रकुलने सांगितले होते की, तिने पॉकेटमनीसाठी चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला होता.

2011 मध्ये, रकुलने ‘फेमिना मिस इंडिया’ स्पर्धेत भाग घेतला आणि 5 टायटल्स जिंकली.
2011मध्ये तिने सिद्धार्थ राजकुमारसोबत तेलुगू चित्रपट 'केरातम'मध्ये काम केले होते. त्यानंतर अभिनेत्रीने तमिळ चित्रपट ‘थडियारा ठका’मध्ये सहाय्यक भूमिका केली.
यानंतर रकुल प्रीत सिंहने 2018मध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘अय्यारी’ या चित्रपटात काम केले. यानंतर रकुल अजय देवगणसोबत 'दे दे प्यार दे' चित्रपटातही झळकली.
रकुल प्रीत सिंह ‘मरजावाँ’, ‘शिमला मिर्ची’, ‘सरदार का ग्रँडसन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.
रकुल प्रीत तिच्या आगामी थ्रिलर चित्रपट ‘रनवे 34’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ज्यात ती अजय देवगण आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार आहे. 21 मार्च रोजी या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला.
रकुल प्रीत सिंह लवकरच ‘अटॅक’, ‘रनवे 34’, ‘डॉक्टर जी’, ‘थँक गॉड’, ‘आयलन’, ‘छत्रीवाली’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.