ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Follow us :

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बॉलिवूड
  • केवळ प्रकाश राजच नाही, गोविंदा आणि अनु कपूर यांनीही आपल्या पत्नीसोबत दोनदा विवाह केला; कारण खूपच रोचक

केवळ प्रकाश राजच नाही, गोविंदा आणि अनु कपूर यांनीही आपल्या पत्नीसोबत दोनदा विवाह केला; कारण खूपच रोचक

एबीपी माझा वेबटीम Updated at: 25 Aug 2021 03:57 PM (IST)
1

अलीकडेच दुखापतीमुळे चर्चेत आलेले दाक्षिणात्य चित्रपटांचे सुप्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाबद्दल चर्चेत आले आहेत. प्रकाश राज यांनी त्यांची पत्नी पोनी वर्मासोबत दुसरे लग्न केलंय. स्वतःच्या पत्नीशी दुसरे लग्न झाल्याच्या बातमीने सर्वांना आश्चर्यचकित केलंय.

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

प्रकाश यांनी या लग्नाची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत, त्यानंतर प्रत्येकाने त्यांनी हे पाऊल का उचलले यावर चर्चा सुरू केलीय. आपल्या पत्नीशी दुसऱ्यांदा लग्न करणारा प्रकाश हे एकमेव अभिनेता नाहीत. त्यांच्या आधी अभिनेते गोविंदा आणि अनु कपूर यांनीही असं केलं आहे. दुसऱ्यांदा पत्नीशी लग्न करण्याचे त्यांचे कारणही खूप मनोरंजक आहे.

3

प्रकाश राज यांनी दुसऱ्यांदा त्यांच्या पत्नीशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला याचे कारण त्यांनी स्वतः सांगितले आहे. त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोंसह संपूर्ण गोष्ट उघड केली.

4

प्रकाश यांनी सांगितले की त्यांनी आपल्या मुलाच्या फायद्यासाठी हे पाऊल उचलले आहे, कारण त्याच्या मुलाला त्यांचे लग्न पुन्हा पहायचे होते. त्यांनी लिहिले, की आम्ही आज रात्री पुन्हा लग्न केले कारण आमच्या मुलाला आमचे लग्न पाहायचे होते.

5

अभिनेता गोविंदाने करिअरच्या अगदी सुरुवातीला 1987 मध्ये सुनीतासोबत प्रेम विवाह केला होता. त्याने त्याचे लग्न 4 वर्षे लपवून ठेवले होते जेणेकरून त्याचा त्याच्या कामावर परिणाम होणार नाही. यानंतर, वयाच्या 49 व्या वर्षी गोविंदाने पुन्हा एकदा सुनीताशी पूर्ण रीतिरिवाजाने लग्न केले. एका मुलाखतीत गोविंदाने सांगितले की त्याने हे त्याच्या आईच्या सांगण्यावरून केले कारण त्याची आई अंकशास्त्रावर खूप विश्वास ठेवते. म्हणूनच त्याला वयाच्या 49 व्या वर्षी सुनीताशी पुन्हा लग्न करायचे होते.

6

अनु कपूर यांचे आयुष्य चढ-उतारांनी भरलेले होते. त्यांनी 1992 मध्ये अनुपमा पटेल यांच्याशी लग्न केले होते. पण 1993 मध्ये त्यांना घटस्फोट दिला, त्यानंतर झीटीव्हीच्या 'सारेगामापा' शो दरम्यान ते त्याच्या सह-होस्ट अरुणिता मुखर्जीच्या प्रेमात पडले. 1995 मध्ये त्यांनी अरुणिताशी लग्न केले. 2001 मध्ये दोघांना एक मुलगी झाली, पण या काळात अनु कपूर पुन्हा एकदा पहिल्या पत्नीच्या संपर्कात आला. सत्य समोर आल्यानंतर अरुणिता यांनी अनु कपूर यांना घटस्फोट दिला, त्यानंतर 2008 मध्ये अनुने पुन्हा एकदा त्याची पहिली पत्नी अनुपमा पटेलशी लग्न केले. दोघांना 3 मुले आहेत आणि आता ते सुखाने वैवाहिक जीवन जगत आहेत.

NEXT PREV

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.