कधीकाळी रजनीकांत यांच्यासाठी हिंदी सिनेसृष्टीतील 'या' लेडी सुपरस्टारनं ठेवलेला उपवास; कारण माहितीय?
Rajinikanth Kissa: दाक्षिणात्य सिनेसृष्टी ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयानं संपूर्ण इंडस्ट्री गाजवणारं नाव म्हणजे, रजनीकांत. या नावाला आज इतर कोणत्याही ओळखीची गरज नाही.
Sridevi Rajinikanth Kissa
1/9
रजनीकांत म्हणजे, असा अभिनेता जो साऊथ चित्रपटांपासून ते बॉलीवूडपर्यंत सपूर्ण इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात रजनीकांत यांचे अनेक चाहते आहेत. तसेच, रजीनिकांत यांनी आजवर अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. पण, श्रीदेवी यांच्यासोबतची त्यांची जोडी प्रेक्षकांना विशेष आवडली. दोघांनी एकत्र अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
2/9
आज आम्ही तुम्हाला रजनीकांत आणि श्रीदेवी यांचा एक किस्सा सांगणार आहोत. एकदा श्रीदेवी यांनी रजनीकांत यांच्यासाठी आठवडाभर उपवास पकडला होता.
3/9
रजनीकांत यांना जसं मिलेनियम स्टार म्हणून ओळखलं जातं, त्याचप्रमाणे श्रीदेवी यांचीही सुपरहिट अभिनेत्रींमध्ये गणना होते. या दोघांनी वेगवेगळ्या भाषांमधील पंचवीसहून अधिक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. या दोघांनी कन्नड, मल्याळम, तेलगू आणि तामिळसह हिंदी भाषेतील चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं.
4/9
श्रीदेवी यांच्याशी संबंधित एका घटनेचा संदर्भ देत रजनीकांत यांनी स्वतः सांगितलं होतं की, 2011 मध्ये शुटिंगदरम्यान त्यांची तब्येत खूपच खालावली होती.
5/9
त्यानंतर त्यांना तातडीनं सिंगापूरला उपचारासाठी नेण्यात आलं. श्रीदेवी यांना ही बातमी कळताच त्या खूप अस्वस्थ झाल्या.
6/9
श्रीदेवी रजनीकांत यांच्या तब्येतीची काळजी करू लागल्या आणि त्यांनी त्यांच्यासाठी उपवास ठेवला.
7/9
श्रीदेवी यांनी केवळ उपवासंच ठेवला नाहीतर त्या साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला देखील गेल्या होत्या. शिर्डीला जाऊन त्यांनी रजनीकांत यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.
8/9
काही दिवसांनी रजनीकांत यांची तब्येत बरी झाली आणि ते घरी परतले, तेव्हा श्रीदेवीही त्यांचे पती बोनी कपूर यांच्यासोबत त्यांची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचल्या होत्या.
9/9
दरम्यान, श्रीदेवी यांचं दुबईत एका लग्नसोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी गेल्या होत्या. तिथेच त्यांचं अपघाती निधन झालं. मात्र, आजही त्यांचे चाहते त्यांची आठवण काढतात.
Published at : 25 Oct 2024 10:45 AM (IST)