अक्षय कुमारसोबत 'हेराफेरी'त काम करणाऱ्या ह्या बाल अभिनेत्रीला ओळखलं का?
संपादित छायाचित्र
1/7
देवी प्रसाद यांची मुलगी रिंकूच्या अपहरणाने 2000 मध्ये रिलीज झालेला हेरा-फेरी हा चित्रपट सुपरहिट झाला होता. चित्रपटात राजू म्हणजे अक्षय कुमार, श्याम म्हणजे सुनील शेट्टी आणि बाबूराव अर्थात परेश रावल या लोकांना धुमाकूळ घातला होता.
2/7
या चित्रपटात रिंकूची भूमिका साकारणारी अॅन अलेक्सिया एनरा आता मोठी झाली असून तिच्या बोल्ड लूकमुळे अनेकदा सोशल मीडियाच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये असते. अभिनयापलीकडे अलेक्सिया पर्यावरणवादी आणि उद्योजक झाली आहे.
3/7
अलेक्सियाचे इन्स्टाग्राम अकाउंट पाहून, कोणालाही असा अंदाज लावणे कठीण जाईल की ती हेरा-फेरीमध्ये बाल कलाकार होती. मात्र, अभिनयापलीकडेही लोक तिच्या कामाचे खूप कौतुक करतात.
4/7
चेन्नईमध्ये राहणाऱ्या अॅनीने स्वत: ला एक्स-अभिनेत्री म्हटले आहे. पर्यावरणला वाचवण्यासाठी तिने 'टेक मी बॅक चेन्नई' आणि 'वेस्टेड 360' या मोहिमांमध्ये भाग घेतला आहे.
5/7
आपल्या पहिल्या चित्रपटात सुपरस्टार कमल हासन सोबत काम करणार्या अॅनीने लिहिले की, 'माझ्याकडे बरेच डीएम आले आहेत, ज्यामध्ये माझ्या पहिल्या चित्रपटाचे फोटोंची विचारणा केलीय.' पण आता अॅनीचा चेहरा पूर्णपणे बदलला आहे.
6/7
अक्षय कुमारबरोबर तिच्या बालपणाचा फोटो शेअर करताना अॅनीने लिहलंय की, 'हे आजवरचे माझे सर्वोत्तम शूट आहे'. या फोटोत अक्षय कुमार आणि अॅनीही आनंदी दिसत आहेत.
7/7
एका मुलाखतीत अॅनने म्हटले होते की, जर हेरा फेरी 3 बनवला तर तिला त्यामध्ये सहभागी व्हायला आवडेल.
Published at : 17 Apr 2021 03:17 PM (IST)