PHOTO : बॉलिवूडच्या ‘पतौडी’ घराण्याची लेक, मनोरंजन विश्वात गाजवतेय नाव! वाचा सारा अली खानबद्दल...
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आज (12 ऑगस्ट) तिचा 27वा वाढदिवस साजरा करत आहे. सारा अली खानचा जन्म 12 ऑगस्ट 1995 रोजी बॉलिवूडच्या ‘पतौडी’ घराण्यात झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाराचे वडील सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि आई अमृता सिंह (Amruta Singh) दोघेही प्रसिद्ध कलाकार आहेत. केवळ आई-वडीलच नव्हे तर, आजी देखील सुप्रसिद्ध अभिनेत्री असल्याने सारावर लहानपणापासूनच अभिनयविश्वाचा प्रभाव होता.
आपणही अभिनेत्रीच व्हायचं, हे साराने बालपणीच ठरवले होते. आपलं बालपणीचं स्वप्न पूर्ण करणारी सारा आजघडीला एक यशस्वी अभिनेत्री बनली आहे.
सारा अली खानने अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर सारा रणवीर सिंहसोबत ‘सिम्बा’ या चित्रपटात दिसली.
या चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टी याने स्वतः म्हटले होते की, स्टारकिड असूनही साराने कोणतीही ओळख न वापरता स्वतःच्या मेहनतीने या चित्रपटातील भूमिका मिळवली होती. त्याच वेळी, सारा कार्तिक आर्यनसोबत ‘लव आज कल’ या चित्रपटात झळकली होती.
यासोबतच सारा वरुण धवनसोबत ‘कुली नंबर’ या चित्रपटात दिसली होती. सारा अली खान शेवट ‘अतरंगी रे’ या चित्रपटात दिसली होती. अभिनेत्री लवकरच विकी कौशलसोबत एका चित्रपटात दिसणार आहे, ज्याचे नाव अद्याप ठरलेले नाही. त्याचबरोबर, ती विक्रांत मेस्सीसोबतही आगामी चित्रपटात चमकणार आहे. (Photo : @Sara Ali Khan/IG)