Pooja Bhatt: वयाच्या 44 व्या वर्षी अभिनेत्री पूजा भट्टनं सोडली दारु; बिग बॉसमध्ये सांगितला किस्सा
बिग बॉस OTT 2 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली अभिनेत्री पूजा भट्टने (pooja bhatt ) शोमध्ये दारूच्या व्यसनाबाबत सांगितलं.
(Pooja Bhatt/instagram)
1/8
नुकताच अभिनेत्री पूजा भट्टनं 'बिग बॉस ओटीटी सीझन 2' या शोमध्ये एक किस्सा सांगितला आहे.
2/8
'बिग बॉस OTT 2' मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली अभिनेत्री पूजा भट्टने शोमध्ये सायरस ब्रोचा आणि इतर सह-स्पर्धकांना तिनं वयाच्या 44 व्या वर्षी दारूच्या व्यसनावर कशी मात केली, याबद्दल सांगितलं.
3/8
पूजा म्हणाली, "मला मद्यपानाचे व्यसन होते आणि ते मी स्वीकारले होते, नंतर हे व्यसन सोडण्याचा निर्णय मी घेतला."
4/8
पुढे पूजा म्हणाली, 'समाज हा पुरुषांना परवाना देतो.ज्यामुळे पुरुष व्यसनाबद्दल आणि दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याबद्दल उघडपणे बोलू शकतात. मात्र, महिला खुलेआम दारू पित नाहीत आणि त्यामुळे त्या मोकळेपणानं याबद्दल बोलू शकत नाहीत. लोक मला व्यसनी म्हणायचे. पण नंतर मी दारु सोडण्याचा निर्णय घेतल्यावर त्याबद्दल मोकळेपणानं बोलण्याचा निर्णय घेतला.'
5/8
दिल है के मानता नहीं, सडक, सर, हम दोनों आणि चाहत यांसारख्या चित्रपटांमध्ये पूजानं काम केलं आहे.
6/8
बिग बॉस ओटीटीमध्ये 13 मध्ये पूजानं सहभाग घेतल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
7/8
पूजा आता बिग बॉस ओटीटीमध्ये 13 मध्ये अजून कोणकोणते किस्से सांगणार आहे? याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
8/8
पूजा ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. पूजाच्या बॉम्बे बेगम्स या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
Published at : 19 Jun 2023 07:00 PM (IST)