सामंथा-नागाच्या आधी, अभिषेक-ऐश्वर्यापासून निक प्रियांकापर्यंत, या स्टार्सच्या घटस्फोटांबद्दल अफवा पसरल्या होत्या
सध्या साऊथची सुपरस्टार सामंथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाच्या चर्चा माध्यमांमध्ये सुरु आहेत. एवढेच नाही तर दुसरीकडे अश्लील व्हिडिओ प्रकरणानंतर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यातही सर्व काही ठीक नसल्याची अफवा पसरली आहे. आम्ही तुम्हाला अशा सेलेब्स बद्दल सांगणार आहोत ज्यांचा घटस्फोट होणार असल्याची अफवा पसरली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसामंथा आणि नागा चैतन्य यांच्यात कुरबूर सुरु आहे. जेव्हा सामंथाने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून अक्किनेनी आडनाव काढून टाकलं तेव्हा ही चर्चा सुरु झाली. एवढेच नाही तर सामंथा चैतन्याचे वडील नागार्जुन यांच्या वाढदिवसाच्या पार्टीलाही उपस्थित राहिली नाही. जरी या दोघांकडून याबद्दल कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु, या बातमीने चाहत्यांना नक्कीच त्रास झाला आहे.
पॉर्न व्हिडिओमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अटकेदरम्यान दोघांमध्ये घटस्फोटाच्या अफवाही होत आहेत. मात्र, आतापर्यंत हे सर्व केवळ अफवा असल्याचे सिद्ध होत आहे.
प्रियंका चोप्रा आणि निक जोनास 2017 मध्ये विवाहबद्ध झाले. त्यावेळी त्या दोघांचे लग्न 117 दिवसात मोडेल अशा शक्यता वर्तवण्यात येत होत्या. पण. या जोडीने ह्या चर्चा खोट्या असल्याचे सिद्ध केले.
टीव्हीवरील लोकप्रिय जोडी देबीना बॅनर्जी आणि गुरमीत सिंग यांचीही छान केमिस्ट्री आहे. काही काळापूर्वी त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनाही उत आला होता.
जॉन अब्राहम आणि प्रिया रुंचाल यांच्या विभक्त होण्याबाबत अनेकवेळा अफवा पसरल्या आहेत. मात्र, जॉनने या सर्व अफवांना खोटे ठरवले आहे. आणि हे जोडपे अजूनही चांगले वैवाहिक जीवन जगत आहेत.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनाही त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांना सामोरे जावे लागले. पण अभिषेकने हे स्पष्ट केले होते की ऐश्वर्याला माहित आहे की तो तिच्यावर किती प्रेम करतो आणि मला माहित आहे की ती माझ्यावर किती प्रेम करते. 'माझे लग्न आणि माझे आयुष्य मीडियाद्वारे ठरवले जाणार नाही'.
टीव्ही अभिनेते जय भानुशाली आणि माही विज यांच्या विभक्त होण्याच्या बातम्याही समोर आल्या, पण दोघांनीही या अफवांना खोटं ठरवलं.