In Pics: 'या' सिल्वर स्क्रीन जोड्या प्रेक्षकांनी नाकारल्या
शाहिद कपूर आणि विद्या बालनची जोडीदेखील प्रेक्षकांनी नापसंत पडली होती. ते दोघे 'किस्मत कलेक्शन' नावाच्या चित्रपटात एकत्र दिसले होते. पण प्रेक्षकांना काही ही जोडी आवडली नाही. चित्रपटात शाहिदसोबत विद्या बालनची केमिस्ट्री जमली नव्हती. त्या चित्रपटानंतर दोघांनी एकत्र एकही चित्रपट केला नाही. (Photo Credit - Social Media)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउदय चोप्रा आणि प्रियंका चोप्राची जोडीदेखील प्रोक्षकांना आवडली नव्हती. दोघे 'प्यार इम्पॉसिबल' चित्रपटात एकत्र दिसले होते. पण चित्रपट आणि त्या दोघांची जोडी दोन्ही गोष्टी फ्लॉप झाल्या होत्या. त्यानंतर दोघे कधीच एकत्र दिसून आले नाहीत. (Photo Credit - Social Media)
वेकअप सिड चित्रपटात रणबीर कपूर आणि अभिनेत्री कोकणा सेन शर्मा एकत्र दिसले होते. पण या जोडीला प्रेक्षकांपर्यंत जो संदेश पोहोचवायचा होता तो प्रेक्षकांपर्यंत पोहचलच नाही. त्यामुळे ही जोडीदेखील प्रेक्षकांची नावडती ठरली. (Photo Credit - Social Media)
कटरीना कॅफने एका चित्रपटात गोविंदासोबत काम केले होते. त्या चित्रपटाचे नाव 'पार्टनर' असे होते. त्याच चित्रपटात सलमान खान आणि लारा दत्ता ही जोडी देखील होती. सलमान आणि लाराची जोडी प्रेक्षकांना आवडली परंतु कटरीना आणि गोविंदाच्या जोडीला मात्र प्रेक्षकांनी नाकारलं. (Photo Credit - Social Media)
पद्मावत चित्रपट प्रचंड गाजला होता. बॉक्सऑफिसवर देखील त्याने आपला दबदबा टिकवला होता. चित्रपटातील प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं. पण तरीही चित्रपटातील दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूरची जोडी प्रेक्षकांना आवडली नव्हती. (Photo Credit - Social Media)
पद्मावत चित्रपटात शाहिदने राजा रतन सिंह आणि दीपिकाने रानी पद्मावतीचे पात्र साकारले होते. दोघांनी चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू दाखवली होती. पण तरीही प्रेक्षकांच्या मनात घर तयार करण्यात ते अयशस्वी ठरले. (Photo Credit - Social Media)