Ashok Kumar : बॉलिवूडचा पहिला 'अॅंटी हीरो' अशोक कुमार!
'दादामुनी' या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते अशोक कुमार यांची आज पुण्यतिथी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशोक कुमार यांचा जन्म 13 ऑक्टोबर 1911 रोजी झाला. कुमुदलाल गांगुली असं त्यांचं नाव होतं.
अशोक कुमार यांनी देविका राणी ते मीना कुमारीपर्यंत त्याकाळातील अनेक नायिकांसोबत काम केलं आहे.
बॉलिवूडचा पहिला 'अॅंटी हीरो' म्हणूनही अशोक कुमार ओळखले जात.
अशोक कुमार यांनी सिनेमांसह मालिकेतदेखील काम केलं आहे.
1943 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'किस्मत' या सिनेमात ते पहिल्यांदा अॅंटी हीरो'च्या भूमिकेत दिसले होते.
अशोक कुमार यांनी 2001 साली वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
अभिनयासोबत ते एक उत्तम गायक आणि चित्रकारदेखील होते.
अशोक कुमार यांनी होमिओपॅथीची पदवी घेतली होती. अनेक रुग्णांना त्यांनी बरं केलं आहे.
अशोक कुमार यांचे अनेक सिनेमे गाजले आहेत. 'जीवन नया' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.