Asha Bhosale: आशा भोसले यांचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मान; गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडला पुरस्कार सोहळा
‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याला अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. गेट वे ऑफ इंडिया येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळा पार पडला.
(Eknath Shinde/twitter)
1/9
राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार पद्मविभूषण ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle Latest News) यांना प्रदान करण्यात आला आहे.
2/9
गेट वे ऑफ इंडिया येथे एका दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
3/9
‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (sachin tendulkar latest news) उपस्थित होता.
4/9
‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आशा भोसले (Asha Bhosle Latest News) म्हणाल्या आहेत की, 'हा पुरस्कार माझ्यासाठी भारतरत्न आहे.''
5/9
‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात आयुष्यातील पहिलं गाणं, संगीतक्षेत्रातील करिअरबाबत आशा भोसले यांनी प्रेक्षकांना सांगितलं.
6/9
आशा भोसले यांनी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात अनेक आठवणींना उजाळा दिला.
7/9
'कोल्हापुरात 10 वर्षाची असताना, 1943 साली मी पहिलं गाणं गायलं. त्यावेळी मी प्रचंड घाबरले होते, मी थरथर कापत होते.' असं यावेळी आशा भोसले यांनी सांगितलं.
8/9
पुढे आशा भोसले यांनी सांगितलं, 'मी महाराष्ट्राची मुलगी याचा अभिमान आहे.'
9/9
आशा भोसले यांनी अनेक हिट गाणी गायली. त्यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
Published at : 25 Mar 2023 08:35 AM (IST)