Aryan Khan Movies : अभिनेता म्हणून नाही, पण बालपणापासूनच बॉलिवूडमध्ये काम करतोय Aryan Khan

Continues below advertisement

Aryan Khan (File Photo)

Continues below advertisement
1/7
Aryan Khan Films : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर शाहरुख खानच्या चाहत्यांनी त्याच्या मुंबईतील घराबाहेर जल्लोष केला. आर्यन खाननं जरी अद्याप अभिनेता म्हणून बॉलिवूड डेब्यू केलेला नाही, परंतु, तरी त्यानं बॉलिवूडच्या पाच चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
2/7
आर्यन खाननं बालकलाकार म्हणून दिग्दर्शक करण जोहरचा चित्रपट 'कभी खुशी कभी गम'मध्ये काम केलं होतं. या चित्रपटात आर्यन खानने शाहरुख खान जी भूमिका साकारत होता, त्याच्या लहानपणीची भूमिका साकरली होती.
3/7
आर्यन खान 2006 मध्ये आलेला चित्रपट 'कभी अलविदा ना कहना' मध्ये बालकलाकार म्हणून काम करताना दिसून आला होता. या चित्रपटात शाहरुख खान, अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी आणि प्रिति झिंटा मुख्य भूमिकेत होते.
4/7
आर्यन खाननं अॅनिमेटेड चित्रपट 'हम हैं लाजवाब'साठी वॉईस ओव्हर दिला होता. या चित्रपटासाठी त्याला बेस्ट चाइल्ड वॉइस ओव्हर आर्टिस्टचा अवॉर्डही मिळाला आहे.
5/7
शाहरुख खानसोबत आर्यन खाननं आणखी एक अॅनिमेटेड चित्रपट 'द लायन किंग' मध्येही वॉईस ओव्हर दिला आहे. या चित्रपटात सिंबाच्या पात्राला आवाज दिला होता.
Continues below advertisement
6/7
आर्यन खान, शाहरुख खानचा आगामी चित्रपट 'पठाण'मध्येही काम केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटासाठी आर्यननं अनेक काम केली आहेत. 'पठाण'मध्ये शाहरुख खानसोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहिमही दिसून येणार आहे.
7/7
आर्यन खानला अभिनयाची आवड नाही. पण त्याला ओळखणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की, त्याला अभिनयापेक्षा जास्त दिग्दर्शनाची आवड आहे. तसेच आर्यन खान अत्यंत क्रिएटिव्ह आहे.
Sponsored Links by Taboola