Anushka Sharma : अनुष्का शर्माची हायकोर्टात याचिका दाखल
अभिनेत्री अनुष्का शर्मानं विक्रीकर विभागाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाल 2012-13 आणि 2013-14 ची थकबाकी वसूल करण्यासाठी विक्री कर विभागाने बजावलेल्या नोटीसविरोधात अनुष्कानं ही याचिका दाखल केली आहे.
दोन्ही वर्षांसाठी आलेल्या दोन स्वतंत्र नोटीसांना अनुष्कानं दोन स्वतंत्र याचिकांद्वारे आव्हान दिलं आहे.
अनुष्कानं यापूर्वी याच मुद्यावर आपल्या कर सल्लागारामार्फत याचिका दाखल केली होती.
अभिनेत्री अनुष्का शर्माला विक्रीकर विभागानं नोटीस बजावली आहे.
अनुष्कानं एका पुरस्कार सोहळ्यात केलेलं सादरीकरण आणि निवेदन यामुळे व्यावसायिकरित्या तिच्या उत्पादनांची जाहिरातबाजी झालेली आहे, असा ठपका विक्रीकर विभागानं ठेवला आहे.
अनुष्का शर्माचा 'चकदा एस्कप्रेस' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अनुष्का सध्या 'चकदा एस्कप्रेस' या सिनेमाचं शूटिंग करत आहे.
अनुष्काचा 'चकदा एस्कप्रेस' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
अनुष्का सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.