Anant Ambani Radhika Merchant : अंबानींची बातच न्यारी! अनंत-राधिका प्री-वेडिंगपर्यंत 51,000 लोकांना देणार 'अन्नसेवा'; पाहा फोटो
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचं प्री-वेडिंग लवकरच होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजामनगरमध्ये 1 ते 3 मार्च दरम्यान अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचं प्री-वेडिंग पार पडणार आहे.
प्री-वेडिंगआधी अनंत आणि राधिकाने जामनगर आणि जवळपासच्या गावांमध्ये अन्नसेवा केली आहे.
अन्नसेवेचा हा कार्यक्रम प्री-वेडिंगपर्यंत सुरू राहणार आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट प्री-वेडिंग पर्यंत 51,000 लोकांना अन्नसेवा देणार आहेत.
मुकेश अंबानी, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट जामनगरमधील लोकांना जेवण वाढतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला दिग्गजांची मांदियाळी असणार आहे.
बॉलिवूडसह इतर सर्वच क्षेत्रातील दिग्गज मंडळी अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला हजेरी लावणार आहेत.
गुजरात येथील जामनगरमध्ये जुलैमध्ये अनंत आणि राधिका लग्नबंधनात अडकणार आहेत.