In Pics : Amitabh Bachchan आणि Jaya Bachchan यांच्या लग्नाचा हा भन्नाट किस्सा माहित आहे का?
Amitabh Bachchan and Jaya Bachchan Anniversary
1/8
आज बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाचा 48 वा वाढदिवस आहे. अमिताभ बच्चन यांच्या वडिलांनी घातलेल्या अटीमुळे या जोडप्यानं अति घाईत लग्न उरकलं.
2/8
याबद्दलचा किस्सा अमिताभ यांनीच काही वर्षांपूर्वी सांगितला होता. अमिताभ यांनी सांगितलं की, ते आणि जया 'जंजीर' या चित्रपटात एकत्र काम करत होते, त्यावळी ठरलं होतं की जर हा चित्रपट हिट ठरला तर सर्वांनी लंडनला फिरायला जायचं.
3/8
मग यावर अमिताभ बच्चन यांच्या वडिलांनी सांगितलं की, फक्त लग्नानंतरच तुला जयासोबत फिरायला जायची परवानगी मिळेल. त्यावेळी अमिताभ यांनी त्यांना सांगितलं की मग आम्ही लग्न करतो.
4/8
त्यानंतर घाईत या जोडप्यानं अत्यंत साधेपणानं आपलं लग्न उरकलं.
5/8
3 जून 1973 रोजी या दोघांनी, जया बच्चन यांच्या एका मित्राच्या घरी लग्न केलं. या लग्नामध्ये केवळ दोन्हीकडची कुटुंबं उपस्थित होती.
6/8
अमिताभ यांनी सांगितलं की, ते त्यावेळी भाड्याच्या घरात रहायचे. त्यामुळे जया यांच्या मित्राच्या घरी लग्न समारंभ पार पडला.
7/8
'जंजीर' हा चित्रपट हिट ठरला आणि सर्व टीम लंडनला फिरायला गेली. त्यावेळी अमिताभ आणि जया यांनी आपला हनिमूनही उरकूला.
8/8
अमिताभ आणि जया बच्चन यांनी अनेक चित्रपटांत एकत्रित काम केलंय. त्यामध्ये शोले, गुड्डी आणि सिलसिला या सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
Published at : 03 Jun 2021 10:33 AM (IST)