Pushpa 2: रिलीज आधीच 'पुष्पा 2'नं केली कोट्यवधींची कमाई; 'बाहुबली 2' आणि 'आरआरआर' चं रेकॉर्ड तोडलं
पुष्पा: द राइज या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता पुष्पा-2 या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
pushpa 2
1/8
अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा-2 (Pushpa 2) या चित्रपटाची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत.
2/8
पुष्पा: द राइज या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
3/8
आता या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच पुष्पा द रुल हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
4/8
आता पुष्पा-2 या चित्रपटानं रिलीज होण्याआधीच कोट्यवधींची कमाई केली आहे.
5/8
रिपोर्टनुसार, दिग्दर्शक सुकुमार यांच्या 'पुष्पा 2' चित्रपटाचे ऑडिओ राइट्स काही दिवसांपूर्वी विकले गेले आहेत. 'पुष्पा 2' चे ऑडिओ राइट्स 65 कोटी रुपयांना विकले गेले आहेत.
6/8
एका रिपोर्टनुसार, साउथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या 'बाहुबली 2' आणि 'R R R' या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे ऑडिओ राइट्स सुमारे 10 कोटी ते 25 कोटींमध्ये विकले गेले होते. त्यामुळे आता 'बाहुबली 2' आणि 'R R R' या चित्रपटांचे ऑडिओ राइट्स प्राइजचे रेकॉर्ड पुष्पा-2 या चित्रपटानं तोडलं आहे.
7/8
काही दिवसांपूर्वी पुष्पा-2 या चित्रपटामधील अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनचा लूक रिव्हिल करण्यात आला होता. दोघांच्याही लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली.
8/8
पुष्पा द राइज (Pushpa: The Rise - Part 1) या चित्रपटातील श्रीवल्ली आणि पुष्पाच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
Published at : 04 May 2023 12:19 PM (IST)