Alia Bhatt Baby : आलिया आणि रणबीर लवकरच आई-बाबा होणार; डिलीव्हरीसाठी आलिया रुग्णालयात दाखल
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट् (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) ही जोडी सध्या त्यांच्या होणाऱ्या बाळामुळे चर्चेत आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलवकरच त्यांच्या घरी चिमुकल्याचं आगमन होणार आहे. भट्ट आणि कपूर कुटुंबामध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे.
अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आपल्या बाळला जन्म देणार आहे. आलिया पती रणबीर कपूरसोबत सकाळच सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात पोहोचली आहे.
आलिया रुग्णालयात दाखल झाल्यानंतर कपूर कुटुंबीय आणि चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आलिया आणि रणबीरच्या बाळाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर पहाटे HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये जाताना दिसले. गाडीतून जातानाचे दोघांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आलिया भट्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कधीही ती बाळाला जन्म देऊ शकते.
आलिया भट्टने तिच्या लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यानंतरच चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली होती.
गेल्या महिन्यात आलिया भटचं डोहाळ जेवण म्हणेज बेबी शॉवर कार्यक्रम पार पडला होता.
आलिया भट्टच्या बेबी शॉवरची बरीच चर्चाही झाली. या फंक्शनमधील फोटो समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.