Ajay Devgn Birthday: अजय देवगण आहे कोट्यवधींचा मालक; जाणून घ्या संपत्तीबाबत...

सिंघम, दृष्यम यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम करणारा अजय हा कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे. जाणून घेऊयात त्याच्या संपत्तीबाबत...

Ajay Devgn Birthday

1/10
बॉलिवूडचा सिंघम अशी ओळख असणाऱ्या अजय देवगणचा (Ajay Devgn) आज 54 वा वाढदिवस आहे.
2/10
अजयनं हिंदी चित्रपटसृष्टीत विशेष ओळख निर्माण केली आहे.
3/10
अजय हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो.
4/10
सिंघम, दृष्यम यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम करणारा अजय हा कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे.
5/10
अजय देवगणची एकूण संपत्ती 427 कोटी आहे. चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच अजय हा ब्रँड एंडोमेंट देखील करतो.
6/10
एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार अजय हा एका चित्रपटासाठी 30 ते 50 कोटी रुपये मानधन घेतो.
7/10
1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या फूल और कांटे या चित्रपटाच्या माध्यामातून अजयनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
8/10
आजयनं दिलवाले,धनवान, विजयपथ, प्यार तो होना ही था या चित्रपटांमध्ये देखील काम केलं.
9/10
अजय देवगणने चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मितीही केली आहे.गेल्या वर्षी रिलीज झालेल्या अजयच्या दृष्यम-2 या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली.
10/10
आता त्याचा भोला (Bholaa) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. भोला या चित्रपटाचं अनेक जण सोशल मीडियावर कौतुक करत आहेत.
Sponsored Links by Taboola