Aryan Khan ला अटक करणारे Sameer Wankhede आहे 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीचा नवरा..

या आधीही समीर वानखेडेने खूप हाई प्रोफाइल ड्रग्स केस उघड केल्यात. समीर वानखेडेच्या बायको बद्दल बोलायचं झालं तर ती स्वतः एक मराठमोळी अभिनेत्री आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
समीर वानखेडेची बायलो म्हणजे प्रसिध्द मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर, क्रांती रेडकरने अनेक सिनेमांमध्ये काम केलंय. अजय देवगन सोबत तिने चित्रपट गंगाजल (2003) मध्येही काम केलंय.

समीर वानखेडेची बायलो म्हणजे प्रसिध्द मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर, क्रांती रेडकरने अनेक सिनेमांमध्ये काम केलंय. अजय देवगन सोबत तिने चित्रपट गंगाजल (2003) मध्येही काम केलंय.
क्रांती रेडकरने जत्रा (2006), करार (2017), नो एंट्री पुढे धोका आहे (2012) अश्या अनेक मराठी चित्रपटात काम केलंय. सध्या क्रांती एक इन्फ्लुइन्सर असून एक फैशन लाईनचीही मालकिन आहे .
सध्या समीर हे शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व टिमने मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. क्रांतीने इ-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये पती समीर यांच्या कामगिरीबद्दल तिला अभिमान वाटतो असे सांगितले.
पुढे तिने सांगितले, 'तो अनेक वेळा ऐवढा व्यस्त असतो की त्याला झोपायला देखील वेळ मिळत नाही. तो फक्त 2 तासच झोपतो. जेव्हा तो एखाद्या विशिष्ट प्रकरणाबद्दल फोनवर बोलत असतो तेव्हा मी कधीही त्याचे लक्ष विचलीत होईल असे काही बोलत नाही. तो दररोज गुप्त ऑपरेशन्ससाठी काम करतो आणि त्याला त्याच्या कुटुंबासमोर या ऑपरेशन्स संबंधित काहीही उघड करण्याची परवानगी नाही. मी त्याच्या समोर कोणत्याच गोष्टीची तक्रार करत नाही. समीर अशा क्षेत्रात आहे जिथे एक मिनिटही काम न करता बसता येत नाही. मला त्याच्या कामाचा आणि त्याचा अभिमान आहे.' (सर्व फोटो : सोशल मीडिया)