ऐश्वर्या रायपासून दीपिका पादुकोणपर्यंत या अभिनेत्रींच्या मंगळसूत्रांची किंमत ऐकून बसेल धक्का
आपल्या देशात विवाहाला खूप महत्त्व दिले जाते. यातच लग्नात वरांनी वधूला घातलेल्या मंगळसूत्रालाही एक विशेष अर्थ प्राप्त होतो. प्रत्येक मुलीसाठी, हे तिच्या प्रेमाचे लक्षण आहे. एका वेबसाइटनुसार मंगळसूत्र या शब्दामध्ये मंगल शब्दाचा अर्थ शुभ आणि सूत्र म्हणजे धागा. मंगलसूत्र म्हणजे एक शुभ धागा जो दोन आत्म्यांना एकत्र जोडतो. सामान्य मुलगी असो वा बॉलिवूड अभिनेत्री, तिचं मंगळसूत्र सर्वांसाठी खास आहे. जे ती मनापासून बनवते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही बॉलिवूड अभिनेत्रींच्या महागड्या मंगळसूत्रांबद्दल सांगणार आहोत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचे मंगळसूत्र खूप खास आहे. त्याची किंमत 45 लाख रुपये आहे. हे डायमंड पेंडेंट काळ्या मण्यांनी बनवलेलं आहे.
अनुष्का शर्माच्या मंगलसूत्रामध्ये हिऱ्यांचा वापर करण्यात आला आहे. यात मध्यभागी फुलांचे डिझाईन आहे. याची किंमत सुमारे 52 लाख रुपये आहे
बॉलिवूडच्या देसी गर्ल म्हणजेच प्रियंका चोप्रा जोनासचे मंगळसूत्र सब्यसाची हेरिटेज ज्वेलरीपासून बनलेलं आहे. यात चार काळे मणी असलेली सोन्याची साखळी आणि पेंडंट म्हणून टी-ड्रॉपच्या आकारात हिरा कापलेला असून त्याची किंमत 52 लाख आहे.
बॉलिवूड आणि दक्षिणची प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवालचे मंगळसूत्र दीपिका पादुकोणशी अगदी साम्य आहे. यात एक लहान मण्याची साखळी आणि एक लहान डायमंड सॉलिटेअर पेंडेंट आहे.
दीपिका पादुकोणचे मंगळसूत्र ब्लॅक बीडेड लेस आणि लहान डायमंड पेंडेंटचे आहे. जे सुमारे 20 लाख रुपयांचे आहे. (सर्व फोटो सोशल मीडिया साभार)