Adipurush : अखेर मुहूर्त ठरला; वादाच्या भोवऱ्यात अडकलेला 'आदिपुरुष' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या बहुप्रतीक्षित 'आदिपुरुष' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'आदिपुरुष' या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती.
'आदिपुरुष' हा सिनेमा 16 जून 2023 रोजी 3D मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'आदिपुरुष' या सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यापासून हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
तसेच हिंदू महासभा आणि भाजपकडून सैफच्या लूकवर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
'आदिपुरुष' हा पौराणिक शैलीतील सिनेमा आहे.
हिंदी, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये 'आदिपुरुष' हा सिनेमा रिलीज होणार आहे.
आता रिलीज डेट जाहीर झाल्यामुळे 'आदिपुरुष' या सिनेमाची सिनेप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत.
'आदिपुरुष' हा सिनेमा आता सिनेमागृहात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे.
'आदिपुरुष' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवणार आहे.