Photos: ‘या’ बॉलिवूड अभिनेत्री कमाईत नवऱ्यालाही मागे टाकतात

bollywood

1/5
बॉलिवूडमधील एक जोडी म्हणजे अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी. मीडिया रिपोर्ट्सनुसार हेमा मालिनी यांची एकूण संपत्ती 440 कोटी रुपये आहे तर धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती 335 कोटी रुपये आहे.
2/5
अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार ऐश्वर्याची एकूण संपत्ती 227 कोटी रुपये तर अभिषेकची एकूण संपत्ती 203 कोटी रुपये आहे.
3/5
हॉट कपल अशी ओळख असलेले बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर. मीडिया रिपोर्ट्सनुसार बिपाशाची एकूण संपत्ती 113 कोटी रुपये आहे तर करणची एकूण संपत्ती 13 कोटी रुपये आहे.
4/5
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल नुकतेच विवाहबंधनांत अडकले. रिपोर्ट्सनुसार कतरिनाची एकूण संपत्ती 224 कोटी रुपये आहे तर विकी कौशलची एकूण संपत्ती 25 कोटी रुपये आहे.
5/5
बॉलिवूडमधील कायम चर्चेत असलेलं कपल म्हणजे दीपिका पदूकोण आणि रणवीर सिंह. मीडिया रिपोर्ट्सनुसार दीपिकाची एकूण संपत्ती 316 कोटी रुपये आहे तर रणवीरची एकूण संपत्ती 307 कोटी रुपये आहे.
Sponsored Links by Taboola