Actress Sonam Kapoor: प्रेग्नेंसीनंतर ही बॉलिवूड अभिनेत्री कमबॅकसाठी सज्ज, तीन वर्षानंतर सेटवर परतणार
अनिल कपूरची मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूर गरोदरपणापासूनच सिने जगतापासून दूर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता सोनमचा मुलगा दोन वर्षांचा झाला असून आता ती लाईट, कॅमेरा आणि ॲक्शनच्या दुनियेत परतण्यासाठी सज्ज झाली आहे.
अभिनेत्री सोनम कपूर पुढील वर्षाच्या सुरुवातीला आपल्या प्रेग्नंसी नंतरच्या पहिल्या प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी सज्ज झाली आहे.
हा प्रोजेक्ट एका ग्लोबल प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंग होणार आहे. या प्रोजेक्टबाबतची अधिक माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे.
सोनम कपूरचा पुढचा प्रोजेक्ट OTT प्लॅटफॉर्मसाठी असणार आहे. मात्र हा चित्रपट असेल की वेब सिरीज याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
सोनमने सांगितले की, “पुढच्या वर्षी मी सेटवर परतणार आहे. या प्रोजेक्टची घोषणा होईपर्यंत मी जास्त काही सांगू शकत नाही. हा एक मोठा प्रोजेक्ट आहे. मी सध्या एवढेच सांगू शकते असे तिने सांगितले.
सोनम कपूर ही शेवटची 'ब्लाइंड' चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट 7 जुलै 2023 रोजी OTT प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर प्रदर्शित झाला. पण लोकांना हा चित्रपट फारसा आवडला नाही.
2018 मध्ये सोनमने प्रियकर आनंद अहुजासोबत लग्नगाठ बांधल्यानंतर ती सिनेसृष्टीपासून काहीशी दूर झाली होती. या काळात तिचे मोजकेच चित्रपट प्रदर्शित झाले. 2022 मध्ये मुलगा वायुच्या जन्मानंतर सोनम ही सिने इंडस्ट्रीपासून पू्र्णपणे दूर झाली होती.