Sherlyn Chopra : 'बिग बॉस' ते 'स्पिल्ट्सविला' गाजवणारी शर्लिन चोप्रा! जाणून घ्या अभिनेत्रीबद्दल खास गोष्टी...

शर्लिन चोप्रा एक उत्कृष्ट अभिनेत्री असण्यासोबत मॉडेलदेखील आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
हैदराबादमध्ये जन्मलेली शर्लिन चोप्रा अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे.

शर्लिनने 2005 साली 'टाइमपास' या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे.
शर्लिनने अनेक हिंदी सिनेमांत छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.
छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस' या लोकप्रिय कार्यक्रमातील तिसऱ्या पर्वात शर्लिन सहभागी झाली होती.
एमटीव्हीच्या 'स्पिल्ट्सविला' या कार्यक्रमातदेखील शर्लिन सहभागी झाली होती.
शर्लिन चोप्राने आता एका फायनान्सरविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
फायनान्सरने शर्लिनला जीवे मारण्याची धमकीदेखील दिली आहे.
शर्लिनने याआधी सिने-दिग्दर्शक साजिद खान विरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती.
शर्लिन चोप्रा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.