In Pics | पृथ्वीवरील स्वर्गाला भेट देऊन परतली सारा अली खान
चित्रीकरण, कार्यक्रम आणि दिवसभराच्या व्यग्र वेळापत्रकातून अभिनेत्री सारा अली खान हिनं काही दिवसांपूर्वी पृथ्वीवरील स्वर्गाला भेट दिली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपृथ्वीवरील स्वर्ग अर्थात काश्मीरमध्ये जाऊन सारा नुकतीच मुंबईत परतली आहे. पण, असं असलं तरीही ती काश्मीर, गुलमर्गच्याच आठवणींमध्ये रमली आहे.
सोशल मीडियावर सारानं पोस्ट केलेले काहा फोटो पाहून याचा सहज अंदाज लावता येत आहे.
सारा तिची आई, अमृता सिंह आणि भाऊ इब्राहिमसोबत या खास सुट्टीवर गेली होती.
अतिशय खास अशा ठिकाणी गेल्यानंतर तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनाही या ठिकाणची सफर घडवली.
बर्फाच्छादित प्रदेशात निसर्गाचं एक वेगळं रुप पाहण्यापासून ते अॅडवेंचर स्नो स्पोर्ट्समध्ये सहभागी होण्यापर्यंतची धमाल सारानं या काश्मीर सफरीमध्ये केली.
काश्मीरचं सृष्टीसौंदर्य पाहून अनेक चाहत्यांनी या ठिकाणाला भेट देण्याची इच्छाही व्यक्त केली.
साराचे हे फोटो आणि तिचं हे खास फॅमिली व्हेकेशन सर्वांनाच #HolidayGoals देत आहे. (सर्व छायाचित्रं- सारा अली खान/ इन्स्टाग्राम)