Happy Birthday Raveena Tandon : 'मस्त-मस्त गर्ल' रविना टंडनच्या अदा, चाहते फिदा
90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडनचा आज 47वा वाढदिवस. (Photo:@RaveenaTandonOfficial/FB)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरविना टंडन सुपरस्टार यश स्टारर 'केजीएफ चॅप्टर 2'मध्ये दिसून येणार आहे. याआधी 2017 मध्ये आलेल्या 'मातृ' या चित्रपटात रविना दिसून आली होती. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत होती. (Photo:@RaveenaTandonOfficial/FB)
रविना टंडन आज 47 वर्षांची झाली आहे. परंतु, आजही आपल्या सौंदर्याने आणि अदांनी ती नवख्या अभिनेत्रींना मागे टाकते. रविनाचा नो-मेकअप लूक फार प्रसिद्ध आहे. (Photo:@RaveenaTandonOfficial/FB)
रविना टंडन आणि अक्षय कुमार यांनी बराच काळ एकमेंकाना डेट करत होते. मोहरा चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतरही त्यांनी एकत्र अनेक चित्रपट केले. (Photo:@RaveenaTandonOfficial/FB)
रविना टंडनने 1991 मध्ये 'पत्थर के फूल' या चित्रपटात अभिनेता सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यु केला होता. चित्रपट फारसा गाजला नाही. परंतु, या चित्रपटातील रविनाच्या अभिनयाचं कौतुक करण्यात आलं होतं. (Photo:@RaveenaTandonOfficial/FB)
अक्षय कुमार व्यतिरिक्त सुपरस्टार गोविंदा आणि रविना या जोडीलाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. दोघांनी दुल्हेराजा, अखियों से गोली मारे, बडे मिया छोटे मिया यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. (Photo:@RaveenaTandonOfficial/FB)
आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या काळजाचा ठाव घेणारी रविना आजही आपल्या सौंदर्याने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. (Photo:@RaveenaTandonOfficial/FB)