राजेश्वरी खरातला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले...
राजेश्वरी (Rajeshwari Kharat) सोशल मीडियावर तिच्या डान्सचे व्हिडीओ देखील शेअर करते. या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन तिला ट्रोल केलं आहे.
Rajeshwari Kharat
1/8
अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) ही सोशल मीडियावर (Social Media) तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. तिचा चाहता वर्ग मोठा आहे.
2/8
फॅंड्रीमधील शालू या भूमिकेमुळे राजेश्वरी खरातला विशेष लोकप्रियाता मिळाली. राजेश्वरी सोशल मीडियावर तिच्या डान्सचे व्हिडीओ देखील शेअर करते.
3/8
नुकताच राजेश्वरी तिच्या डान्सचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन राजेश्वरी खरातला ट्रोल केलं आहे.
4/8
राजेश्वरीनं तिचा डर्टी लिटील सिक्रेट या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमधील राजेश्वरीच्या लूकने अनेकांचे लक्ष वेधले. काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओला कमेंट करुन राजेश्वरीला ट्रोल केले.
5/8
राजेश्वरीच्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'म्हणूनच नागराज सर तुला पुन्हा चान्स देत नाहीत.' तर दुसऱ्या युझरने कमेंट केली, 'चांगलं करिअर आहे. त्याच्याकडे लक्ष दे नको ते रील्स बनवत बसू नको.'
6/8
एका नेटकऱ्याने राजेश्वरीला ट्रोल करत कमेंट केली, शालूवर काळ्या चिमणीची जादू झाली वाटतं.' राजेश्वरीच्या या व्हिडीओला 16 हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे. 115K नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
7/8
राजेश्वरी खरातला इन्स्टाग्रामवर 320K फॉलोअर्स आहेत. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. राजेश्वरी ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
8/8
राजेश्वरी खरातला फॅंड्री या चित्रपटामधील 'शालू' भूमिकेमुळे विशेष ओळख मिळाली.
Published at : 21 Feb 2023 08:45 PM (IST)