Pooja Sawant: कोणती भूमिका साकारायची इच्छा आहे? पूजा सावंत म्हणते...
अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) ही तिच्या अभिनयानं आणि ग्लॅमरस स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपूजा ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
पूजानं नुकतीच अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली.
मुलाखतीमध्ये पूजाला कोणती भूमिका साकारण्याची इच्छा आहे? असा प्रश्न विचारण्यात आला.
या प्रश्नाचं उत्तर देत पूजा म्हणाली, 'मला ऐतिहासिक भूमिका करायची इच्छा आहे.'
पुढे पूजा म्हणाली, 'मला स्मिता पाटील या खूप आवडतात. त्यांच्या जैत रे जैत या चित्रपटातील भूमिकेसारखी भूमिका मला करायची आहे.'
क्षणभर विश्रांती या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
पूजानं पोस्टर बॉय, सतरंगी रे,गोंदण, आता गं बया,नीळकंठ मास्तर, साटं लोटं पण सगळं खोटं, दगडी चाळ, दगडी चाळ 2 या चित्रपटांमध्ये काम केलं.