PHOTO : मॉडेलिंग ते यशस्वी अभिनेत्री, अभिनेत्री मुग्धा गोडसेचा संघर्षमय प्रवास!
फॅशन चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री मुग्धा गोडसे आज तिचा 36वा वाढदिवस साजरा करत आहे.
Actress Mugdha Godses
1/7
'फॅशन' चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री मुग्धा गोडसे (Mugdha Godse) आज (26 जुलै) तिचा 36वा वाढदिवस साजरा करत आहे. मुग्धाचा जन्म 1986 मध्ये पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.
2/7
मराठी माध्यमात शिकलेली मुग्धा आपल्या मेहनतीच्या जोरावर आज मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री बनली आहे. सुरुवातीपासूनच तिने आपल्या करिअरमध्ये प्रचंड संघर्ष केला.
3/7
शिक्षण पूर्ण केल्यानंतर, करिअरच्या सुरुवातीच्या काळात, मुग्धा तिच्या गरजा भागवण्यासाठी आणि इतर खर्चासाठी पेट्रोल पंपावर काम करायची. या कामासाठी तिला दिवसाला 100 रुपये मिळायचे. यानंतर मुग्धाने जिममध्ये काम करायला सुरुवात केली. या दरम्यान तिने काही स्थानिक सौंदर्य स्पर्धांमध्येही भाग घेतला. 2002 हे वर्ष मुग्धाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे आणि तिच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष ठरले.
4/7
याच वर्षी मुग्धाला ‘ग्लॅडरॅग्स मेगा मॉडेल हंट’ ही स्पर्धा जिंकून पहिले यश मिळाले, जे तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरले. या विजयानंतर मुग्धा प्रसिद्धी झोतात आली. याशिवाय 2002मध्येच मुग्धाने ‘मिस इंडिया’मध्ये ‘बेस्ट मॉडेल’ आणि ‘बेस्ट नॅशनल कॉस्च्युम’चा किताब पटकावला होता.
5/7
2004 मध्ये, मुग्धा ‘फेमिना मिस इंडिया’ स्पर्धेतही ती सेमीफायनलमध्ये पोहोचली होती. यानंतर मुग्धा बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी स्वप्नांची नगरी मुंबईत आली. यानंतर तिने एअरटेल, क्लोजअप सारख्या अनेक मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींमध्ये काम केले आणि यासोबतच तिने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये सहभाग घेत रॅम्प वॉक केला.
6/7
मुग्धाने 2008मध्ये मधुर भांडारकरच्या 'फॅशन'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील मुग्धाचा अभिनय चांगलाच पसंत केला गेला होता. या चित्रपटाच्या यशानंतर मुग्धाने 'ऑल द बेस्ट', 'जेल', 'हेल्प', 'हिरोईन', 'साहेब, बीवी और गँगस्टर रिटर्न्स' इत्यादी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले.
7/7
मुग्धा अजूनही चित्रपटसृष्टीत सक्रिय असून, लवकरच ती एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुग्धाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, ती गेल्या बऱ्याच वर्षांपासून अभिनेता राहुल देवसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे. (Photo : @Mugdha Godse/IG)
Published at : 26 Jul 2022 09:38 AM (IST)