PHOTO: जेनेलिया डिसूजाचा देसी लूक; साडीत दिसतेय खासमखास!
बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूजा भलेही फिल्मी दुनियेपासून दूर असली तरी तिचे कॉमेडी व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात. त्याचबरोबर तिची फॅशन स्टाइलही जबरदस्त आहे.(फोटो सौजन्य : geneliad/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेनेलिया देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तीचे सुमारे 10 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. (फोटो सौजन्य : geneliad/इंस्टाग्राम)
अभिनेत्री जेनेलिया डिसूझाने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती हटके लूक मध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य : geneliad/इंस्टाग्राम)
जेनेलियाने या फोटोशूट साठी साडी परिधान केलेली दिसत आहे. निळी साडी आणि त्यावर हटके ब्लाऊज असा लूक तिने केला आहे.(फोटो सौजन्य : geneliad/इंस्टाग्राम)
बन हेअरस्टाइल आणि ब्राईट मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य : geneliad/इंस्टाग्राम)
2008 मध्ये 'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या जेनेलियाने अभिनेता रितेश देशमुखसोबत लग्न केले. दोघांना दोन मुले आहेत. लग्नानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतून दीर्घकाळ ब्रेक घेतला.(फोटो सौजन्य : geneliad/इंस्टाग्राम)