Disha Patani: दिशा पाटनीच्या नाकाकडे सर्वांचं लक्ष; व्हिडीओवर कमेंट करत झाली ट्रोल!
Disha Patani Reached At Salman Khan Film Antim Screening : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) तिच्या सौंदर्याने नेहमीच चाहत्यांची मनं जिंकते (photo: dishapatani/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या दिशाचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) आणि आयुष शर्मा (Aayush Sharma) यांच्या 'अंतिम' या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग मुंबईमध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी या स्क्रीनिंगला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. दिशा देखील या स्क्रीनिंगला आली. यावेळी अनेकांचे लक्ष दिशाच्या नाकाकडे गेलं. (photo: dishapatani/ig)
'अंतिम' चित्रपटाच्या स्क्रीनिंग इव्हेंटमधील दिशाच्या या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. दिशाने नकाची प्लॅस्टिक सर्जरी (नोज जॉब) केली आहे का? असा प्रश्न दिशाचा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांना पडत आहे. या व्हिडीओमध्ये दिशा पिवळ्या रंगाचा क्रोप टॉप आणि डेनिम अशा लूकमध्ये दिसत आहे. (photo: viralbhayani/ig)
सलमान खानच्या राधे चित्रपटामध्ये दिशाने प्रमुख भूमिका साकारली होती(photo: dishapatani/ig)
तिच्या या चित्रपटातील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. लवकरच तिचा व्हिलन2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.(photo: dishapatani/ig)
या चित्रपटात दिशासोबतच तारा सुतारिया, अर्जुन कपूर आणि जॉन अब्राहम महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सूरी यांनी केले आहे. (photo: dishapatani/ig)